नांदेड शहरात रविवारी २७ वी रत्नेश्वरी पाऊस दिंडी
नांदेड, 27 जून (हिं.स.)। मराठवाड्यात यंदा समाधानकारक पाऊस पडावा, धरणे व जलसाठे भरावेत, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे तसेच अमरनाथ यात्रा निर्विघ्न व यशस्वी पार पडावी, या प्रार्थनेसाठी २७ वी रत्नेश्वरी पाऊस दिंडी रविवारी (ता. २८) सकाळी सहा वाजता जी.जी.
नांदेड शहरात रविवारी २७ वी रत्नेश्वरी पाऊस दिंडी


नांदेड, 27 जून (हिं.स.)।

मराठवाड्यात यंदा समाधानकारक पाऊस पडावा, धरणे व जलसाठे भरावेत, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे तसेच अमरनाथ यात्रा निर्विघ्न व यशस्वी पार पडावी, या प्रार्थनेसाठी २७ वी रत्नेश्वरी पाऊस दिंडी रविवारी (ता. २८) सकाळी सहा वाजता जी.जी. रोडवरील बालाजी मंदिर येथून प्रस्थान करणार आहे. धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अमरनाथ यात्री संघ, भाजप नांदेड महानगर आणि लायन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात निघणाऱ्या दिंडीचे मार्गातील विविध ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी चहा, नाश्ता, भोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दिंडीत नांदेड ते रत्नेश्वरी गड मार्गावर यात्रेकरू जांभूळ, सीताफळ, आंबा, करंज, बाभूळ आणि लिंबोळी यांसह विविध वृक्षांच्या हजारो बियांची पेरणी करणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेले सीड बॉल जंगल परिसर आणि डोंगरमाथ्यांवर टाकण्यात येणार आहेत. दिंडी रत्नेश्वरी गडावर पोचल्यानंतर सामूहिक आरती करण्यात येणार असून सामूहिक प्रार्थना करण्यात येणार आहे. उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande