
नांदेड, 27 जून (हिं.स.)। गरीब कुटुंबातून शिक्षण घेत जिद्द, कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या बळावर पोलीस सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणारे देगलूरचे सुपुत्र जगदीश राजना भंडरवार यांची उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ), भोकर उपविभाग येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे देगलूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शाासनाच्या आदेशानुसार जगदीश भंडरवार यांची पदोन्नतीने पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा जालना येथे नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर नव्या आदेशानुसार त्यांच्या नियुक्तीत बदल करण्यात आला असून, त्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकर उपविभाग, नांदेड येथे बदली करण्यात आली आहे.
जगदीश भंडरवार यांनी पोलीस दलात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर उच्च पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांचा संघर्षमय प्रवास हा आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. उच्च पदापर्यंतचा त्यांचा संघर्षमय प्रवास आजच्या तरुणांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे. श्मेहनत, प्रामाणिकपणा आणि जिद्द असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नसते, हे जगदीश भंडरवार यांच्या उदाहरणावरुन दिसून येत आहे. भोकरसारख्या महत्त्वाच्या उपविभागाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने देगलूरमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis