
छत्रपती संभाजीनगर, 27 जून (हिं.स.) - छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कन्नड येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती. बँक निवडणुकीच्या नियोजनाबाबत सखोल चर्चा होऊन पुढील दिशा निश्चित करण्यात आली..
यावेळी मंत्री अतुल सावे साहेब, खासदार संदीपान भुमरे साहेब, आमदार अब्दुल सत्तार साहेब, आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे, आमदार विलासभाऊ भुमरे, आमदार सौ.संजनाताई जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष संजयभाऊ खंबायते, माजी आमदार नितीन पाटील, नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते..
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis