गरळ ओकणाऱ्यांना दूर ठेवावे लागेल - प्रीतम मुंडे
बीड, 27 जून (हिं.स.)। ''पंकजाताईच्या जिवावर जे निवडून आले, ज्यांनी तीन वर्षे आमदारकी भोगली, पचवली आणि ढेकर दिले, तेच आता गरळ ओकताहेत. अशा लोकांना दूर ठेवयाचे असेल तर इथे शत प्रतिशत भाजप आला पाहिजे'', असे आवाहन प्रीतम मुंडे यांनी माजलगाव मध्ये उपस
Q


बीड, 27 जून (हिं.स.)। 'पंकजाताईच्या जिवावर जे निवडून आले, ज्यांनी तीन वर्षे आमदारकी भोगली, पचवली आणि ढेकर दिले, तेच आता गरळ ओकताहेत. अशा लोकांना दूर ठेवयाचे असेल तर इथे शत प्रतिशत भाजप आला पाहिजे', असे आवाहन प्रीतम मुंडे यांनी माजलगाव मध्ये उपस्थितांना केले.

विधानसभा निवडणुकीत मराठा, ओबीसी उमेदवार दिला. त्यांना कोट्यवधी रुपये दिले आणि मला पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी एका कार्यक्रमात केला होता. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्याकडे त्यांचा रोख होता. माजलगाव मध्ये भाजपच्या 'एसआयआर' शिबिरात बोलताना प्रीतम मुंडे यांनी प्रकाश सोळंके यांच्यावर पलटवार केला.

शेतात पीक घ्यायचे असेल तर आधी मशागत करावी लागते. तशी माजलगाव मतदार संघाची मशागत आपल्याला करावी लागेल, चांगले बियाणे पेरावे लागेल. मग त्याला भरपूर पाऊस मिळाला की आपल्याला अपेक्षित पीक, उत्पादन आणि त्याला चांगला भाव मिळेल, असे प्रीतम म्हणाल्या. गरज भासली की काही लोकांना मुंडे साहेब आठवतात. गरज सरली की मुंडे कुटुंबाला विसरतात. अशी 'गरज सरो वैद्य मरो' कार्यपद्धती मतदार संघाने ओळखली आहे, असे म्हणत त्यांनी नाव न घेता आमदार सोळंके यांना टोला लगावला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande