गोमाता संवाद यात्रेचे सोमवारी बीड येथे आगमन
बीड, 27 जून (हिं.स.)। राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग यांच्या वतीने आयोजित राज्यमाता गौमाता संवाद यात्रा सोमवारी बीड येथे येणार आहे. या संवाद यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वारणी येथील केशवराज गोश
गोमाता संवाद यात्रेचे सोमवारी बीड येथे आगमन


बीड, 27 जून (हिं.स.)।

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग यांच्या वतीने आयोजित राज्यमाता गौमाता संवाद यात्रा सोमवारी बीड येथे येणार आहे. या संवाद यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वारणी येथील केशवराज गोशाळेचे सचिव बाळासाहेब केदार यांनी केले आहे.

येत्या सोमवारी (दि.२९) सदरील गोमाता संवाद यात्रा दुपारी साडेचार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, बीड येथे येणार आहे. या

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची तर विशेष उपस्थिती म्हणून पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे या राहणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, प्रमुख पाहुणे खा. रजनी पाटील, खा. बजरंग सोनवणे, आ. विक्रम काळे, राज्य गोसेवा आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, नगराध्यक्षा प्रेमलता पारवे आदींंची उपस्थिती राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande