
छत्रपती संभाजीनगर, 27 जून (हिं.स.) - भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने गणोरी येथे मोफत शासकीय योजना मार्गदर्शन व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच नवीन रेशन कार्ड व दुरुस्ती संदर्भातील मार्गदर्शन आणि नोंदणीची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे अनेक नागरिकांच्या शासकीय कामांना गती मिळाली आणि योजनांची सविस्तर माहितीही त्यांना मिळाली.
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ कोणताही पात्र नागरिक वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या शिबिराचा परिसरातील अनेक गरजू नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लाभ घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis