पत्रकारांच्या सन्मानासाठी कर्जत प्रेस असोसिएशन रस्त्यावर; पोलिसांना निवेदन
रायगड, 27 जून (हिं.स.)। पत्रकारांबाबत खासदार संजय दिना पाटील यांनी कथितरित्या केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ कर्जत प्रेस असोसिएशनच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. संबंधित वक्तव्यामुळे पत्रकारांच्या भावना दुखावल्या गेल्
Karjat Press Association takes to the streets to uphold the dignity of journalists; submits memorandum to the police.


रायगड, 27 जून (हिं.स.)। पत्रकारांबाबत खासदार संजय दिना पाटील यांनी कथितरित्या केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ कर्जत प्रेस असोसिएशनच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. संबंधित वक्तव्यामुळे पत्रकारांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

कर्जत प्रेस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांकडे सादर केलेल्या निवेदनात पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, त्यांच्या कार्याबाबत अवमानकारक किंवा आक्षेपार्ह वक्तव्य करणे योग्य नसल्याचे नमूद केले आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे पत्रकारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधितांवर योग्य ती कारवाई होणे आवश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी कर्जत प्रेस असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी एकत्र येत या घटनेचा निषेध व्यक्त केला. पत्रकारांच्या सन्मानाचे संरक्षण व्हावे तसेच प्रसारमाध्यमांविषयी आदराची भूमिका कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने निवेदन स्वीकारून प्रकरणाची नोंद घेतली असून, संबंधित मागणी वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती कर्जत प्रेस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या प्रसंगी कर्जत प्रेस असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande