कोपरीकरांसाठी प्रसूतीगृहाला कसलीही कमतरता भासू देणार नाही - आ. संजय केळकर
ठाणे, 27 जून (हिं.स.)। केवळ पत्रिकेवर नाव टाकून प्रत्यक्ष आमदारांना आमंत्रणच न दिल्याने कोपरी येथील शेठ लखमीचंद फतीचंद प्रसूतिगृहाचे उद्धाटन वादग्रस्त ठरले. उद्घाटनानंतर आमदार संजय केळकर यांनी पाहणी करताना या प्रसूतिगृहाला कोणतीही कमतरता भासणार ना
Kopri


ठाणे, 27 जून (हिं.स.)। केवळ पत्रिकेवर नाव टाकून प्रत्यक्ष आमदारांना आमंत्रणच न दिल्याने कोपरी येथील शेठ लखमीचंद फतीचंद प्रसूतिगृहाचे उद्धाटन वादग्रस्त ठरले. उद्घाटनानंतर आमदार संजय केळकर यांनी पाहणी करताना या प्रसूतिगृहाला कोणतीही कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न करू असे सांगत प्रसंगी सीएसआर फंड, सामाजिक संस्थांचे योगदान मिळवू, अशी माहिती दिली.

कोपरी येथील शेठ लखमीचंद फतीचंद प्रसूतिगृहाचे उद्धाटन शुक्रवारी घाईघाईने आटोपण्यात आले. या उद्घाटनानंतर आमदार संजय केळकर यांनी या प्रसूतीगृहाची पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी राजेश गाडे, कृष्णा भुजबळ, अमरीश ठाणेकर, विद्या कदम उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना केळकर म्हणाले की, या प्रसूतीगृहाला आठ महिन्यांपूर्वी भेट दिली होती. त्यावेळी इनक्यूबेटर धूळखात पडून होते. नवजात अतिदक्षता विभाग सुसज्ज नसताना पूर्वी उदघाटन करण्यात आले होते. हा कक्ष सुसज्ज होण्यासाठी तब्बल वर्ष लागले. काही महिन्यांपूर्वी खासगी नवजात अतिदक्षता विभागात दिवसाला १५ हजार रुपये आकारले जात होते. महापालिकेचे प्रसूतिगृह बंद असल्याने कोपरीवासींना नाईलाजाने खासगी रुग्णालयात जावे लागत होते. त्यामुळे महापालिकेने कोणत्या कामाला प्राधान्य द्यायला हवे हे ठरवून शेठ लखमीचंद फतीचंद प्रसूतिगृह तातडीने सुसज्ज करायला हवे होते, अशा शब्दांत श्री. केळकर यांनी प्रशासनाचे कान टोचले.

प्रसूतिगृहाचे घाईघाईने उदघाटन झाले असले तरी कोपरीकरांसाठी हे वरदान ठरणार आहे. त्यामुळे येथे कोणत्याही साहित्याची वा सेवेची कमतरता पडणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. प्रसंगी सीएसआर फंड आणि सामाजिक संस्थांची देखिल मदत घेऊ, असे श्री. केळकर यांनी स्पष्ट केले.

*पत्रिकेत नावे पण आमंत्रण नाही*

*यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. पत्रिकेवर आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांची नावे टाकण्यात आली, परंतु त्यांना प्रत्यक्ष निमंत्रण देण्यात आले नाही, असे कृष्णा भुजबळ यांनी सांगितले तर शिवसेनेने देखील युतीधर्म पाळावा, असा टोला एका पदाधिकाऱ्याने हाणला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande