
नांदेड, 27 जून (हिं.स.)।
अर्धापूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, १४१ प्रभागांतील ३७७ सदस्यांच्या आरक्षणाची सोडत विशेष ग्रामसभांमध्ये काढण्यात आली आहे. यंदाच्या आरक्षण सोडतीत मागील निवडणुकीच्या तुलनेत इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) च्या सुमारे ३९ जागा कमी झाल्या असून, खुल्या प्रवर्गातील जागांमध्ये वाढ झाल्याने सोडतीची तालुक्यात चर्चा आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तसेच आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा न ओलांडता ही आरक्षण प्रक्रिया पार पाडण्यात आली. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा घेऊन सदस्यांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
२०२० च्या निवडणुकीतील आरक्षण
अनुसूचित जाती : ७३ जागा
अनुसूचित जमाती : २० जागा
ओबीसी : ९९ जागा
खुला प्रवर्ग : १८४ जागा
दृष्टिक्षेपात आरक्षण प्रक्रिया
एकूण ग्रामपंचायती : ४३
एकूण प्रभाग : १४१
एकूण सदस्यसंख्या : ३७७
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis