माऊली दादांनी साक्षात भगवंताला कीर्तनासाठी उभे केले - ह.भ.प. मुंडे
बीड, 27 जून (हिं.स.)। आपल्या नामस्मरण अन्नदान या तपश्चर्येवर साधनेवर आणि जड जीवांच्या उद्धारकल्याणाची आहारनिष ध्यास चिंता वासल्य भावनेने वाहणाऱ्या माऊली यांनी एकाच दिवशी दोन गावी कीर्तन करून भगवंताला कीर्तनासाठी उभे केले, ही किमया व ताकत माऊलींची
माऊली दादांनी साक्षात भगवंताला कीर्तनासाठी उभे केले - ह.भ.प. मुंडे


बीड, 27 जून (हिं.स.)।

आपल्या नामस्मरण अन्नदान या तपश्चर्येवर साधनेवर आणि जड जीवांच्या उद्धारकल्याणाची आहारनिष ध्यास चिंता वासल्य भावनेने वाहणाऱ्या माऊली यांनी एकाच दिवशी दोन गावी कीर्तन करून भगवंताला कीर्तनासाठी उभे केले, ही किमया व ताकत माऊलींची होती, असे चिंतन ह.भ.प. मुंडे महाराज शास्त्री यांनी मांडले.

२६ व्या पुण्यस्मरण सोहळ्यात श्रीक्षेत्र चाकरवाडी येथील माऊलींच्या समाधी स्थळी कीर्तन सेवेत मुंडे महाराज बोलत होते. पुढे बोलताना मुंडे महाराज म्हणाले, माऊलींच्या पश्चात शुद्ध प्रामाणिक प्रेमयुक्त श्रद्धायुक्त अंतकरणाने माऊलींचा विचार शिकवण तत्व यांचे स्वतः आचरण करून आलेल्या भक्तांना माऊली प्रमाणे वासल्य प्रेम देत भक्तीचा मूलमंत्र देण्यासाठी उत्तरेश्वराची सेवा करणारे श्री. नारायण महाराज आणि चाकरवाडीत माऊलींच्या समाधीची सेवा अखंड करणारे श्री महादेव महाराज माऊली

तात्या ही दोन रत्न कीर्तीवंत तर आहेतच पण जगी ऐसा बाप व्हावा जया वंश सिद्धी जावा याप्रमाणे माऊलींच्या पश्चात चाकरवाडीचे नव्हे तर सर्व भागवत संप्रदायाचे वैभव यामुळे वाढल्याचे सांगितले. माऊलींनी एकाच तारखेस एकाच दिवशी दोन गावी कीर्तन सेवा केल्याचे ज्ञात आहे. खरे तर विस्मरणाने दोन गावांना तारीख दिली होती पण प्रत्यक्षात माऊलींनी एका गावात कीर्तन केले पण जिथे दुसऱ्या गावासाठी कीर्तनाची तारीख निश्चित होती तिथे माऊलींच्या रूपाने साक्षात परमात्मा परमात्मा पांडुरंगाने स्वतः उपस्थित राहून माऊलींच्या कीर्तनाची सेवा परिपूर्ण केली. हा साक्षात्कार केवळ त्यांच्या निसिम भक्ती साधनेची फळ असल्याची सांगितले.

ज्ञानोबारायांच्या सर्वधर्मसमभाव बंधुभाव एकरुपता व भेदाभेद विहिरीत भक्ती स्वरूप म्हणजे माऊली दादा होते. इथे येणारा प्रत्येक माणूस आनंद समाधान सुख व तृप्तता पदरी घेऊन धन्य होतो असे महाराजांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande