
नांदेड, 27 जून (हिं.स.) पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने जिल्ह्यात रविवारी (ता. २८) राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास प.पू. जगदीशजी महाराज बाबाजी यांचे आशीर्वाद लाभणार आहेत. हा कार्यक्रम रविवारी दुपारी चारला विसावा पॅलेस नाना-नानी पार्कजवळ होणार आहे. यावेळी पालकमंत्री अतुल सावे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा मार्गदर्शन करणार आहेत. संवाद यात्रेस गोभक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गोशाळा महासंघाचे मारोतराव कंठेवाड यांनी केले.
याप्रसंगी खासदार अशोक चव्हाण, आमदार हेमंत पाटील, महापौर कविता मुळे, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, खासदार नागेश आष्टीकर, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे आदी उपस्थित राहणार आहेत. यात्रेला २२ जूनला पुणे येथून प्रारंभ झाला. पाच जुलैला यात्रेचा समारोप नागपूर येथे होणार आहे. दरम्यानच्या काळात यात्रा प्रत्येक जिल्हास्थानी जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis