
लातूर, 27 जून (हिं.स.)।
जळकोट तालुक्यात दि. २२ जून रोजी तसेच दि. २४ जून रोजी दमदार पाऊस झाला आहे यामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला असून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभकेला आहे. अल निनोच्या पार्श्वभूमीवर यांना लवकर पेरणी होईल की नाही याची भीती शेतकऱ्यांना होती, मृग नक्षत्रामध्ये पेरणी झाली नाही तसेच कापूस लागवडही झाली नाही. यामुळे यावर्षी चांगला पाऊस पडेल की नाही अशी भीती शेतकऱ्यांना होती मात्र संपूर्ण जळकोट तालुक्यात दि २२ जून रोजी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला यामुळे तालुक्यातील अनेक साठवण तलावे ही ५० टक्के च्यावर भरली आहेत. तसेच अनेक साठवण तलाव शंभर तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने जमिनीत ओलावा टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत याच दिवशी जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा झाला होता. दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना अति पावसामुळे शेतामध्ये जाणे शक्य झाले नाही. दि २४ जून रोजी दुपारपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. दि. २४ जून रोजी दुपारी जळकोट तालुक्यात पुन्हा तासभर पाऊस झाल्यामुळे शेतीची कामे बंद झाली.
दोन दिवस झालेल्या पावसामुळे जळकोट तालुक्यातील शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला असून अनेक शेतकऱ्यांनी आपली मूठ चाड्यावर धरली आहे. जळकोट शहर तसेच परिसरात शेतकरी पेरणी करीत आहेत. कृषी विभागाने शंभर मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला तर पेरणी करावे अशी आवाहन केले होते परंतु पेरणीसाठी अगोदरच खूप उशीर झाल्यामुळे शेतकरी पेरणीसाठी घाई करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis