ठाण्यातील सर्वात जुन्या समर्थ भांडारची निवडणूक बिनविरोध; अध्यक्षपदी विनोद देसाई
ठाणे, 27 जून (हिं.स.)। तब्बल ७९ वर्षे ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक ठरलेल्या समर्थ भांडार अर्थात समर्थ को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स सेंट्रल स्टोअर्स लि. ठाणे या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. २०२६ ते २०३२ या कालावधीसाठी १३ सदस्यांची नव
अध्यक्षपदी विनोद देसाई


ठाणे, 27 जून (हिं.स.)। तब्बल ७९ वर्षे ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक ठरलेल्या समर्थ भांडार अर्थात समर्थ को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स सेंट्रल स्टोअर्स लि. ठाणे या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. २०२६ ते २०३२ या कालावधीसाठी १३ सदस्यांची नव्या संचालक मंडळावर निवड करण्यात आली. त्यानंतर झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत विनोद देसाई यांची अध्यक्षपदी तर संदीप शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

समर्थ भांडार संस्थेचे प्रमुख सल्लागार तथा ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष, भाजप नगरसेवक सीताराम राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. संस्थेच्या सर्व पदांसाठी उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने सदस्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या १९४७ या ऐतिहासिक वर्षातच नोव्हेंबर महिन्यात समर्थ भांडारची स्थापना झाली. गेल्या सात दशकांहून अधिक काळ तब्बल ७९ वर्षे सचोटी, पारदर्शकता आणि ग्राहकाभिमुख सेवेमुळे समर्थ भांडारने ठाणेकरांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये सर्वसाधारण गटातून विश्वनाथ जगन्नाथ देसाई, सुभाष काशिनाथ पाटील, विनोद सखाराम देसाई, संदीप परबत शिंदे, दिलीप नानासाहेब देशमुख, ज्ञानदीप मनोहर जाधव, रोहित विनोद देसाई आणि जयवंत केदू निचळ यांचा समावेश आहे. महिला गटातून समिधा संदीप देसाई, वेदिका वैभव देसाई आणि इतर मागास प्रवर्गातुन कुसुम विजय गावडे, तर अनुसुचित जाती प्रवर्गातुन भगवंत संपतराव हरणे व भटक्या जमाती विशेष प्रवर्गातून निखिल अनिल गोंजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधक अरुणा कोळंबकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. नवीन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली समर्थ भांडार ग्राहकांना पारदर्शक कारभार करून सहकार क्षेत्रातील आदर्श परंपरा अधिक बळकट करेल, असा विश्वास कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande