
अमरावती, 30 जून (हिं.स.) : भाजपच्या संघटनात्मक फेरबदलांत अमरावती शहराध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेल्या नितीन गुडधे यांच्या नियुक्तीला अवघ्या 24 तासांच्या आत स्थगिती देण्यात आल्याने स्थानिक भाजपच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी अमरावती ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड, तर अमरावती शहराध्यक्षपदी नितीन गुडधे यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. या फेरबदलात विद्यमान ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या जागी प्रताप अडसड, तर शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या जागी नितीन गुडधे यांना संधी देण्यात आली होती.
मात्र, या नियुक्तीनंतर अवघ्या एका दिवसातच नितीन गुडधे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्याने
या
दरम्यान, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक बळकटीसाठी मोठे फेरबदल सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून आमदार प्रताप अडसड यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अमरावती महापालिकेतील भाजपच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी न होणे, तसेच मित्रपक्ष युवा स्वाभिमानच्या वाढत्या प्रभावावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत डॉ. नितीन धांडे यांची शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचीही चर्चा आहे.
याशिवाय, नवनियुक्त विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या गटांतील गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाचाही या फेरबदलांशी संबंध असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे नितीन गुडधे यांच्या नियुक्तीला अचानक स्थगिती देण्यामागील नेमके कारण काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी