अकोल्यात भूमी अभिलेख विभागातील गैरव्यवहार प्रकरणात निलंबित उपअधीक्षकावर गुन्हा दाखल
अकोला, 04 जून (हिं.स.)। जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असताना विविध महसुली प्रकरणांमध्ये गंभीर अनियमितता केल्याच्या आरोपांवरून तत्कालीन उपअधीक्षक तथा सध्या निलंबित असलेले पंकज पवार यांच्याविरुद्ध अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्
Photo


अकोला, 04 जून (हिं.स.)। जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असताना विविध महसुली प्रकरणांमध्ये गंभीर अनियमितता केल्याच्या आरोपांवरून तत्कालीन उपअधीक्षक तथा सध्या निलंबित असलेले पंकज पवार यांच्याविरुद्ध अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महसूल व भूमी अभिलेख विभागात मोठी खळबळ उडाली आहे.पंकज पवार यांनी जून २०२३ ते जून २०२५ या कालावधीत उपअधीक्षक पदावर कार्यरत असताना अधिकाराचा गैरवापर करून विविध महसुली प्रकरणांमध्ये नियमबाह्य निर्णय घेतल्याचा आरोप आहे. तपासात जमीन मालकी हक्काशी संबंधित सातबारा नोंदींमध्ये बदल, मृत व्यक्तींच्या नावाने अर्ज स्वीकारणे, भाडे तत्त्वावरील मालमत्तांची पत्रके तयार करणे, सार्वजनिक सुविधांसाठी राखीव जमीन खासगी व्यक्तींच्या नावावर दाखविणे तसेच अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन प्रमाणपत्रे देणे अशा गंभीर बाबी समोर आल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणात शासनाचा विश्वासघात, महसुली नोंदींमध्ये फेरफार आणि शासकीय कामकाजातील अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या तक्रारीनंतर सिटी कोतवाली पोलिसांनी चौकशी करून गुन्हा नोंदविला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande