SIR BLO प्रगणक, पर्यवेक्षकांची प्रगती आढावा बैठक, किटचे करण्यात आले वितरण
अकोला, 04 जून (हिं.स.)। येथे नियोजन भवनात विशेष सघन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेअंतर्गत पर्यवेक्षकांची प्रगती आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत मतदार यादी पडताळणीचे काम, क्षेत्रीय भेटी, प्रपत्र संकलन तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला
Photo


अकोला, 04 जून (हिं.स.)। येथे नियोजन भवनात विशेष सघन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेअंतर्गत पर्यवेक्षकांची प्रगती आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत मतदार यादी पडताळणीचे काम, क्षेत्रीय भेटी, प्रपत्र संकलन तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

संबंधित अधिकाऱ्यांनी पर्यवेक्षकांना मतदार पडताळणीचे काम वेळेत व अचूकपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांना आवश्यक माहिती देऊन त्यांचे सहकार्य मिळवण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीस सर्व संबंधित पर्यवेक्षक, बीएलओ व निवडणूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. SIR मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समन्वय व नियोजनावर विशेष भर देण्यात आला. यावेळी एस आय आर विशेष मोहीम 30 जून पासून सुरू होणार असून त्यापूर्वीच सर्व BLO यांना काम करण्यासाठी एस आय आर किट देण्यात आली. तरी एस आय आर चे प्रभावीपणे पूर्ण राज्यभर काम सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सुद्धा एस आय आर काम करण्यासाठी आलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande