नांदेड- वादळी वाऱ्यामुळे केळीबागा जमीनदोस्त
नांदेड, 04 जून (हिं.स.)।गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यामुळे मुदखेड, अर्धापूर व भोकर तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांच्या कष्टाने जोपासलेल्या केळीबागा जमीनदोस्त झाल्या असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल
अ


नांदेड, 04 जून (हिं.स.)।गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यामुळे मुदखेड, अर्धापूर व भोकर तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांच्या कष्टाने जोपासलेल्या केळीबागा जमीनदोस्त झाल्या असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. खासदार रवींद्र चव्हाण यांनी

नुकसानग्रस्त भागांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधित प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे हंगामातील उत्पन्न पूर्णपणे धोक्यात आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून त्यांना शासनाकडून योग्य व तातडीची आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande