
बीड, 04 जून (हिं.स.)।
आष्टी तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव येथे एका पाईपलाईनच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान भीषण हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी यांनी संगनमत करून लोखंडी गजाने प्राणघातक हल्ला केला. शेतातील मोटार चालू करण्यासाठी जात असताना आरोपींनी त्यांना अडवून शिवीगाळ केली आणि मागून येऊन डोक्यात, हातापायांवर आणि पाठीवर गजाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. पीडिताचा आरडाओरडा ऐकून नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली, त्यानंतर आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देऊन पळ काढला. जखमी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना प्रथमतः आष्टी आणि अहिल्यानगर येथे नेण्यात आले, परंतु पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पीडिताची भाची निर्मल हिने दिलेल्या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नाना भालचंद्र सूर्यवंशी करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis