
नांदेड, 04 जून (हिं.स.)। नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या धर्मपाळून प्रवीण पाटील चिखलीकर यांनी निवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यांच्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. असे माजी आमदार अमर नगरकर यांनी सांगितले.
नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या एकमेकांचे शत्रुत्व असताना देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आली. याच महत्त्वपूर्ण पार्श्वभूमीवर, आज माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात जाहीर पत्रकार परिषद संपन्न झाली.
माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार सुभाष साबणे, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, चैतन्य बापू देशमुख यांच्यासह भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महायुतीचे जिल्ह्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis