नाशिक - मनपा आयुक्तांचा आदेशाला बांधकाम - पाणीपुरवठ्याच्या ठेकेदारांनी दाखविली केराची टोपली
नाशिक, 04 जून (हिं.स.)। - नाशिक मध्ये काय चाललं असं म्हणायची खरंच वेळ आलेली आहे कारण प्रशासकीय अधिकारी आदेश देतात आणि त्याचे पालन कोणीही करायला तयार नाही विशेष करून महानगरपालिका आयुक्तांची तर परिस्थिती इतकी बिकट होत चाललेली आहे की प्रशासकीय अधिकार
Construction and water


नाशिक, 04 जून (हिं.स.)।

- नाशिक मध्ये काय चाललं असं म्हणायची खरंच वेळ आलेली आहे कारण प्रशासकीय अधिकारी आदेश देतात आणि त्याचे पालन कोणीही करायला तयार नाही विशेष करून महानगरपालिका आयुक्तांची तर परिस्थिती इतकी बिकट होत चाललेली आहे की प्रशासकीय अधिकारी त्यांचे आदेश मानायला तयार नाही . महानगरपालिकेतील बांधकाम आणि मलनिःसारण विभागाचे ठेकेदारही त्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा लावत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांची दैनीय परिस्थिती कायम आहे.

नाशिक शहरात कुठेही गेले तरी सर्वत्र खड्डे खोदलेले आहेत विकासकामे सुरू आहेत असं सांगितलं जातं परंतु ज्या ठेकेदारांना रस्त्याचं, पाईपलाईनचं काम दिलेला आहे ते ठेकेदार आज काम करतात पुन्हा पंधरा दिवस त्या कामाकडे फिरूनही बघत नाही. अशा तक्रारी शहरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केल्या कुंभमेळा प्राधिकरणाकडे केल्या परंतु या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली . प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारीकडे गांभीर्याने बघितले नाही त्यामुळे सध्या तरी नाशिक शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सुरू आहे . हा त्रास सहन करूनही नागरिक काम करत आहे परंतु कोणीही त्यांच्या समस्या कमी होतील याकडे लक्ष देण्यास तयार नाही.

नाशिक शहरात होतं काय आहे चाललं काय आहे अशी म्हणायची पाळी आता खरोखरच नागरिकांवरती आली आहे . आता तोंडावरती सिंहस्थ कुंभमेळा आलेला आहे तरीही शहरातील विकास कामांची अवस्था बिकट आहे . त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास हा पावसाळा सुरू होत आहे. तरी देखील कायम आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे सर्वसाधारण महिनाभरापूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की 31 मे नंतर कुठल्याही परिस्थिती मध्ये खोद काम केलं जाणार नाही म्हणजेच आत्ता ज्या पद्धतीप्रमाणे रस्ते खोदून ठेवलेले आहेत ते खोदले जाणार नाहीत त्याच्यावरती पॅचअप करण्याचं काम सुरू केलं जाईल परंतु महापालिका आयुक्तांचे आदेश म्हणजे इकडून तिकडून गेले वारे नळी फुंकली सोनारे अशी अवस्था झालेली आहे . कारण महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी आयुक्त यांचे आदेश ऐकत नाही तर ज्या बांधकाम आणि मुल निसरण विभागाकडून किंवा पाणीपुरवठा विभागाकडून सध्या शहरामध्ये काम सुरू आहेत त्या कामांवर ती किंवा प्राधिकरणाकडून जी काम सुरू आहेत त्या कामांचं पूर्ण नियोजन कोलमडलेला आहे . शहरांमध्ये खड्डे पडलेले आहेत . नागरिक तारेवरची कसरत करत आहेत पण आयुक्तांनी दिलेल्या खोदकाम बंद करण्याच्या आदेशाला कोणीही मानायला तयार नाही . आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानंतरही म्हणजेच 31 मे नंतरही शहरात मखमलाबाद रोडवरील शांतीनगर, गोविंद नगर मधील जॉगिंग ट्रॅक, चांडक सर्कल जवळील रस्ता यासारख्या अनेक ठिकाणी उघडपणे खोदकाम सुरू आहे . महापालिका आयुक्त यांनी दिलेले आदेश हे स्वतः महापालिका अधिकाऱ्यांना आणि प्राधिकरणाच्या प्रशासनाला माहिती आहेत . परंतु एकाने देखील सुरू असलेले खोदकाम बंद करून त्यावरती पॅचअप करण्याचे धाडस दाखवलं नाही म्हणजेच काय तर महापालिका आयुक्त यांचे आदेश म्हणजे केवळ देखावा आहे . हेच प्रशासनाच्या वर्गाला तर सांगायचे नाही अशी परिस्थिती झाली आहे . म्हणूनच नाशिकमध्ये चाललं काय असं म्हणण्याची देखील वेळ आता नाशिक करण वरती आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande