
नाशिक, 04 जून (हिं.स.)।
- विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नासिक मध्ये आता महायुतीचे शिंदे सेनेचे उमेदवार माजी आमदार नरेंद्र दराडे यांना अपक्ष गोकुळ गीते यांनी खुले आव्हान देऊन आपले उमेदवारी कायम ठेवले आहे तर भाजपाचे सदस्य असलेले मालेगावचे प्रसाद हिरे यांनी देखील आपले उमेदवारी कायम ठेवल्याने तिरंगी लढत होणार आहे त्यामुळे नाशिक मध्ये बंडखोर निवडणूक रिंगणात कायम राहिले आहे.
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. त्याकरिता आज गुरुवारी.०४ जून रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीसाठी अंतिम मुदत होती.माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळालानाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीचे चित्र आज (गुरुवारी) अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले असून, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे, अपक्ष उमेदवार गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांच्यात लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून रस्सीखेच पाहायला मिळाली.भाजपचे बंडखोर गणेश गिते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून आपला उमेदवारी अर्ज शेवटचे दहा मिनिटे शिल्लक असताना मागे घेतला. तर त्यांचे बंधू गोकुळ गिते यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने ही निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
गणेश गीते हे भाजपाचे अधिकृत कार्यकर्ता असल्यामुळे त्यांनी माघार घेतली परंतु गोकुळ गीते हे कोणत्याही पक्षाशी निगडित नाही आत्तापर्यंत त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या पटलावरती येऊन प्रत्यक्ष काम केले नाही त्यांचा भाऊ म्हणजेच गणेश गीते हा भाजपाशी निगडित असल्यामुळे त्यांनी गणेश गीते यांच्या करता तसेच त्यांची पत्नी दिपाली या भाजपच्या नगरसेविका व्हाव्यात यासाठी म्हणून आतापर्यंत भाजपचे काम केले परंतु ते भाजपाचे सक्रिय सदस्या नाही ते पिंपळगाव बसवत बाजार समितीचे सदस्य आहे. पण ते राजकीय पक्षाचे नसल्यामुळे ते अपक्ष म्हणूनच निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत तर प्रसाद हिरे हे मालेगाव मध्ये भाजपाचे अधिकृत कार्यकर्ते आहेत परंतु त्यांनी या ठिकाणी बंडखोरी केली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विष्णू म्हैसधुणे आणि प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी देखील विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, काल शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत, दादा भुसे, आमदार सुहास कांदे, किशोर दराडे यांनी म्हैसधुणे आणि बोडके यांची भेट घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर, नाशिक महापालिकेचे उपमहापौर विलास शिंदे आणि येवल्याचे माजी नगरसेवक रामदास दराडे यांच्यासह विष्णू म्हैसधुणे आणि गोरख बोडके जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेतला.
आमचा बाप काढला
दरम्यान, भाजपचे माजी नगरसेवक गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी एका नगरसेवकासोबत फोनवर बोलतांना “गणेश आणि गोकुळ गिते यांच्या बापाला देखील माघार घ्यावी लागेल”, असे बोलल्याचे आरोप केला. त्यामुळे मी माघार घेणार नाही, असे त्यांनी माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV