डोंबिवली एमआयडीसीतील गणपती विसर्जन तलावात मृत मासे, परिसरात तीव्र दुर्गंधी!
डोंबिवली, 04 जून (हिं.स.)। एमआयडीसी परिसरातील गणपती विसर्जन तलावात अचानक मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत तरंगताना आढळले आहेत. सद्यस्थितीत संपूर्ण तलावात मृत माशांचा खच पडला असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक नागरिक
Ph1


डोंबिवली, 04 जून (हिं.स.)।

एमआयडीसी परिसरातील गणपती विसर्जन तलावात अचानक मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत तरंगताना आढळले आहेत. सद्यस्थितीत संपूर्ण तलावात मृत माशांचा खच पडला असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. हा प्रकार वाढत्या प्रदूषणामुळे घडला आहे, की कोणी अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक पाण्यात विषप्रयोग केला आहे? हे अद्याप अस्पष्ट आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या घटनेची भीषणता पाहता, तात्काळ महानगरपालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन नक्की कशा मुळे हे मासे मृत पावले? याची सखोल चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केली जाणार आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मनसे करणार असल्याचे समोर येत आहे.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande