जागतिक सायकल दिनानिमित्त जालना येथे भव्य सायकल रॅली; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
जालना, 4 जून (हिं.स.) : जागतिक सायकल दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, जालना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात जिल्हाधिक
क


जालना, 4 जून (हिं.स.) : जागतिक सायकल दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, जालना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही रॅली सिव्हिल क्लब (आझाद मैदान) येथे यशस्वीरित्या संपन्न झाली.

या प्रसंगी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी रंगमंजू आर., अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनीषा देशपांडे, मनीषा दांडगे, सुकेशिनी पगारे तसेच तहसीलदार छाया पवार उपस्थित होत्या. पोलीस विभाग, एसआरपीएफ, माय भारत उपक्रम, इंडियन मेडिकल असोसिएशन, विविध सायकलिंग ग्रुप्स, व्यावसायिक, उद्योजक आणि नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले.

यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सायकलचे पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित केले. दैनंदिन जीवनात सायकलचा अधिकाधिक वापर करून पर्यावरणपूरक आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान जालना जिल्ह्यातील कैलास झोळगे यांचा व्हिएतनाम येथे झालेल्या प्रतिष्ठित ‘आयर्नमॅन’ स्पर्धेत यशस्वी सहभागाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य जनजागृतीसाठी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. रॅलीचे वाहतूक नियोजन आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस विभागाने मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र बारगजे यांनी केले.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande