नांदेड - मुदखेड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य शेतकरी एल्गार मोर्चा
नांदेड, 04 जून (हिं.स.)। शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत, तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागण्यांसाठी मुदखेड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य शेतकरी एल्गार मोर्चा काढण्यात आला. खत व बिया
Q


नांदेड, 04 जून (हिं.स.)। शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत, तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागण्यांसाठी मुदखेड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य शेतकरी एल्गार मोर्चा काढण्यात आला. खत व बियाण्यांच्या वाढत्या तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून सरकारच्या उदासीन धोरणांचा निषेध करण्यासाठी गाढवांच्या सहभागासह प्रतीकात्मक मोर्चा काढला.

यावेळी लावण्यात आलेल्या फलकांद्वारे सरकारच्या कारभारावर तीव्र टीका करण्यात आली. या आंदोलनात प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande