नांदेड मध्ये आ.अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर एकत्र
नांदेड, 04 जून (हिं.स.)। भाजपा नेते खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आज एकत्र आले. राजकीय संघर्ष सुरू असताना ते दोघे आज एकत्र पत्रकार परिषदेत दिसले. स्थानिक स्वराज्य संस्था (विधान परिषद) निवडणूक २०२६ - महायुती पत्रकार
अ


नांदेड, 04 जून (हिं.स.)। भाजपा नेते खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आज एकत्र आले. राजकीय संघर्ष सुरू असताना ते दोघे आज एकत्र पत्रकार परिषदेत दिसले. स्थानिक स्वराज्य संस्था (विधान परिषद) निवडणूक २०२६ - महायुती पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आज साई सुभाष जनसंपर्क कार्यालय, वसंतनगर, नांदेड येथे स्थानिक स्वराज्य संस्था (विधान परिषद) निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित महायुतीची पत्रकार परिषद यशस्वीरीत्या पार पडली.

यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.आ अमरनाथ राजूरकर यांच्या विजयाचा संकल्प करत, आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर समवेत माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार सुभाषराव साबणे, विधान परिषद महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष माधव पावडे आदींसह महायुतीचे सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बांधव या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित होते.

एकजुटीने आणि जिद्दीने महायुतीचा विजय निश्चित करण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत! असे सांगण्यात आले

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande