पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी 6 जूनला ‘पुणे ट्रॅफिक परिषद’
पुणे, 04 जून (हिं.स.)। शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना शोधण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी (दि. 6) ‘पुणे ट्रॅफिक परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद सकाळी 10 ते दुपारी
पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी 6 जूनला ‘पुणे ट्रॅफिक परिषद’


पुणे, 04 जून (हिं.स.)। शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना शोधण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी (दि. 6) ‘पुणे ट्रॅफिक परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नवी पेठ येथील पत्रकार भवनात होणार आहे.पुण्यातील वाहतूक व्यवस्थेचा सर्वांगीण आढावा घेऊन त्यावर व्यवहार्य उपाय सुचविण्यासाठी या परिषदेत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, वाहतूक तज्ज्ञ, पत्रकार आणि नागरिक सहभागी होणार आहेत.

पुणे शहर काँग्रेसच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी स्पष्ट केले आहे. या परिषदेत अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (वाहतूक) संदीप भाजीभाकरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, महापालिका पथविभाग प्रमुख रोहितदास गव्हाणे, मुख्य अभियंता (प्रकल्प) दिनकर गोजारे,

पुणे मेट्रोचे प्रोजेक्ट डायरेक्टर अतुल गाडगीळ, सीआयआरटीचे तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. ढोले, पीएमआरडीए व पीएमपीएमएलचे अधिकारी, सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हे सर्वजण सहभागी होऊन विविध उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करतील, असे दीप्ती चवधरी यांनी सांगितले. वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग व्यवस्था, रस्ते नियोजन आणि भविष्यातील वाहतूक धोरण यांसारख्या विषयांवर या परिषदेत सविस्तर चर्चा होणार असून पुण्याच्या वाहतूक समस्यांवर दीर्घकालीन उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande