
छत्रपती संभाजीनगर, 04 जून (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपच्या वाट्याला आल्यानंतर त्या ठिकाणी सुहास शिरसाट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
मात्र शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनीदेखील अर्ज भरत बंडखोरी केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांची नाराजी गेली. त्यानतंर त्यांनी समीर सत्तार यांचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे सुहास शिरसाट यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाल्याचं चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis