
नाशिक , 04 जून (हिं.स.)। मालेगांव, नंदूरबार येथे मोठया प्रमाणात बोगस जन्म दाखले मिळून आले आहे. याप्रकरणी तेथे प्रशासनाकडून कारवाई सुरु झाली आहे. नाशिकमध्ये देखील बोगस जन्म दाखल्याचे प्रकार आहेत का ? याची तपासणी महापालिका प्रशासनाने घेण्याची मागणी भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे केली.
गुरुवारी (दि.4) माजी खा. सोमय्या यांनी महापालिकेत आयुक्त खत्री यांची भेट घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, वैद्यकिय अधिकारी डॉ. विजय देवकर, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते ॲड श्याम बडोदे उपस्थित होते. सोमय्या यांनी म्हटले की, महापालिकेच्या तपासणीत जन्म-मृत्यू नोंदणीत कुठलेही संशयास्पद आढळून आल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी. जन्म-मृत्यू दाखल्यातील दुरुस्तीसाठी कोणी येत असेल तर त्याची खातरजमा करण्यासाठी मूळ कागदपत्राची पडताळ्णी करणे गरजेची आहे. दरम्यान येत्या काही दिवसात महापालिका प्रशासन जन्म-मृत्यूच्या नोंदीचे डिजीटायझेशन करणार आहे. डिजीटल रेकॉर्ड टाकताना त्याची कसून चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान सोमय्या यांनी काही महिन्यापूव देखील नाशिक महापालिकेत येत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांची भेट घेऊन त्यांनी शहरातील बोगस जन्म-मृत्यू नोंदी प्रकरणी मोहीम राबवण्याची मागणी केली होती. त्यानंतर गुरुवारी त्यांनी आयुक्त खत्री यांची भेट याबाबत चर्चा केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV