नंदुरबार : विविध विकास कामांचे हसन मुश्रीफांच्या हस्ते लोकार्पण
नंदुरबार, 04 जून (हिं.स.) राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते आज जिल्ह्यातील विविध लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण विकास कामांचे भव्य लोकार्पण करण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांच्या वतीन
लोकार्पण!


नंदुरबार, 04 जून (हिं.स.) राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते आज जिल्ह्यातील

विविध लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण विकास कामांचे भव्य लोकार्पण करण्यात आले. जिल्हा प्रशासन

आणि संबंधित विभागांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण सोहळ्याला जिल्ह्यातील

वरिष्ठ लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्याप्रसंगी आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्तली सेठी,

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक आश्विनी सानप, तसेच

तळोदा विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अनंय नावंदर आदी मान्यवर मंचावर

उपस्थित होते.

जननायक वीर बिरसा मुंडा सभागृहाचे नूतनीकरण:

कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने

करण्यात आलेल्या 'जननायक वीर बिरसा मुंडा सभागृहाच्या' नूतनीकरणाच्या लोकार्पणाने झाली.

अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज झालेल्या या सभागृहाचे रूपडे आता पूर्णपणे पालटले असून, यामुळे

शासकीय बैठका व सांस्कृतिक कार्यक्रमांना एक नवी गती मिळणार आहे.

आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल आशा स्वयंसेविकांचा गौरव:

'सिकलसेल अॅनिमिया निर्मुलन मोहिम 2025' अंतर्गत जिल्ह्यात घरोघरी जाऊन कौतुकास्पद कामगिरी

करणाऱ्या 5 आघाडीच्या आशा स्वयंसेविकांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विशेष सत्कार

करण्यात आला. धडगाव, तळोदा, नवापूर आणि अक्कलकुवा या दुर्गम व आदिवासी बहुल तालुक्यातील या

आशा स्वयंसेविकांनी अत्यंत परिश्रमाने 'बोटाला टोचण्याच्या आधुनिक पद्धतीचा' (डीबीटी टेस्ट किट)

प्रभावी वापर करून शेकडो लाभार्थ्यांची यशस्वी चाचणी केली होती, ज्याची दखल जिल्हा प्रशासनाने

घेतली.

तृतीयपंथीय कल्याण व रोजगार निर्मिती:

सामाजिक बांधिलकी आणि सर्वसमावेशक विकासाचा भाग म्हणून, तृतीयपंथीयांचे कल्याण व तक्रार

निवारण योजनेअंतर्गत उद्योजकता विकास उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील तीन तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार

सुरू करण्यासाठी ब्युटी पार्लर साहित्य संच, केटरिंग व भांडे संच तसेच इलेक्ट्रिक साहित्य संचाचे वितरण

करण्यात आले. या मदतीमुळे तृतीयपंथीय बांधवांना समाजात स्वावलंबनाने व मानाने स्वतःचा व्यवसाय

सुरू करता येणार आहे.

दिव्यांग सक्षमीकरण आणि माहितीपट विमोचन:

याच धर्तीवर, जिल्हा परिषद नंदुरबार प्रस्तुत 'दिव्य अधिकार - सक्षमीकरण दिव्यांगांचे, पाऊल

स्वावलंबनाचे' या विशेष माहितीपटाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच

जिल्ह्यातील गरजू दिव्यांगांना कृत्रिम साहित्याचे मोफत वितरण करून त्यांना आत्मनिर्भरतेचे बळ देण्यात

आले.

'मिशन सक्षम 3.0' अंतर्गत युवकांना प्रशिक्षण:

तरुणांच्या हाताला कौशल्य व रोजगार देण्याच्या उद्देशाने, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग आणि

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन सक्षम 3.0 उपक्रम कौशल्य विकास प्रशिक्षण

कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील युवक-युवतींना उच्च दर्जाच्या कौशल्य

प्रशिक्षणासाठी अहिल्यानगर येथे घेऊन जाणाऱ्या विशेष वाहनास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हिरवी

झेंडी दाखवून या उपक्रमाचा शानदार शुभारंभ केला.

या सर्वसमावेशक विकास कामांमुळे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे जिल्ह्याच्या प्रगतीला आणि दुर्गम

भागातील नागरिकांच्या सक्षमीकरणाला अधिक वेग येईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी

व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande