महाराष्ट्राचा नवा विक्रम; १० लाख सौर कृषिपंपांचा टप्पा पार
पुणे, 05 जून, (हिं.स.)। सौर कृषिपंपांच्या उभारणीत महाराष्ट्राने देशात नवा इतिहास रचत १० लाख सौर कृषिपंप कार्यान्वित करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. प्रधानमंत्री कुसुम-बी आणि राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेअंतर्गत ही ऐतिहासिक कामगिरी
Solor


पुणे, 05 जून, (हिं.स.)। सौर कृषिपंपांच्या उभारणीत महाराष्ट्राने देशात नवा इतिहास रचत १० लाख सौर कृषिपंप कार्यान्वित करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. प्रधानमंत्री कुसुम-बी आणि राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेअंतर्गत ही ऐतिहासिक कामगिरी साध्य करण्यात आली असून, देशातील एकूण सौर कृषिपंपांपैकी तब्बल ६४ टक्के पंप महाराष्ट्रात कार्यान्वित झाले आहेत.महावितरणकडून या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, बुधवारी (ता. ३ जून) महाराष्ट्राने १० लाख सौर कृषिपंपांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. यामुळे सौरऊर्जेच्या वापरातून कृषी क्षेत्राला शाश्वत ऊर्जा उपलब्ध करून देण्यात राज्याने देशात आघाडी कायम राखली आहे.उपलब्ध आकडेवारीनुसार, देशभरात आतापर्यंत १५ लाख ६२ हजार २८९ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यापैकी तब्बल १० लाख ४७२ पंप महाराष्ट्रात कार्यान्वित झाले असून, हा देशातील एकूण संख्येच्या ६४ टक्के इतका वाटा आहे. उर्वरित सर्व राज्यांमध्ये मिळून ५ लाख ६१ हजार ८१७ सौर कृषिपंप कार्यान्वित झाले आहेत.

दरम्यान, महावितरणने ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेअंतर्गत एका महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्याची विक्रमी कामगिरी केली होती. डिसेंबर २०२५ मध्ये या उल्लेखनीय कामगिरीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.सौर कृषिपंपांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत असून, वीजबिलाचा भार कमी होण्यास तसेच सिंचनासाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होण्यास मदत होत आहे. त्यामुळे राज्यातील सौर कृषिपंप योजनेला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande