जळगाव - आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द
जळगाव, 08 जून (हिं.स.) | शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह शासकीय यंत्रणेकडून त्यांचे प्
जळगाव - आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द


जळगाव, 08 जून (हिं.स.) | शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह शासकीय यंत्रणेकडून त्यांचे प्रश्न सोडविण्याची व्यवस्था करण्यात येते. मात्र, सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला महिला लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande