कापूस पीकासाठी १०० टक्के अनुदानावर प्रात्यक्षिक
अकोला, 08 जून (हिं.स.)। केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान (कापूस कांती) सन २०२६-२७ अभियानांतर्गत पिकाची उत्पादकता वाढ व सुधारित वाणांच्या प्रसारासाठी कापूस पीक प्रात्यक्षिके १०० टक्के अनुदानावर शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्र
कापूस पीकासाठी १०० टक्के अनुदानावर प्रात्यक्षिक


अकोला, 08 जून (हिं.स.)।

केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान (कापूस कांती) सन २०२६-२७ अभियानांतर्गत पिकाची उत्पादकता वाढ व सुधारित वाणांच्या प्रसारासाठी कापूस पीक प्रात्यक्षिके १०० टक्के अनुदानावर शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शेतक-यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी प्रति लाभार्थी किमान ०.४० हेक्टर व कमाल २ हेक्टर मर्यादित्त लाभ देय आहे. या बाबीचा लाभ घेणेकरीता महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन खिडकी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कापूस पिक प्रात्यक्षिक अंतर्गत सघन कापूस लागवड प्रात्याक्षिके, क्लोज स्पेसिंग प्रात्याक्षिके, एकात्मिक पिक उत्पादन पीक प्रात्यक्षिके १०० टक्के अनुदानावर राबविण्यात येत असून सदर बाबीचा लाभ घेनेकरीता अर्ज सादर करण्यासाठी शेतक-यांची ॲग्रीस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी निवड लक्षांकाच्या अधीन राहून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात येणार आहे. त्यामुळे या घटकासाठी जास्तीत जास्त इच्छुक शेतकरी बांधवांनी अर्ज करावेत आणि लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता कृषि विभागाच्या सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा..

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande