
नाशिक, 08 जून (हिं.स.)। अधिक मास चालू असूनही गोदावरी नदी पत्रामध्ये पाणी नाही सर्व नदी नाल्यांचे पाणी हे गोदावरी नदीपात्रात असल्याने महापालिकेच्या निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी रामकुंडामध्ये उतरून महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार आंदोलन केले
गोदावरी नदीपात्रात ड्रेनेज तसेच दुर्गंधीयुक्त पाणी सोडून नदीचे प्रदूषण होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी सोमवारी रामकुंड येथे गोदावरीच्या पाण्यात उतरून आंदोलन केले. यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीत भाविक श्रद्धेने स्नानासाठी येतात. मात्र नदीपात्रात सांडपाणी मिसळत असल्याने नदीचे पावित्र्य धोक्यात आले असून प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून गोदावरीत सांडपाणी सोडणे बंद करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली, या आंदोलनात शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक केशव पोरजे, महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले होते. गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी त्वरित कार्यवाही न झाल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV