दादरमध्ये बेस्ट बसचे नियंत्रण सुटून अपघात, एक ठार, 6 जखमी
मुंबई, 08 जून (हिं.स.) - दादर प्लाझाजवळ बेस्टच्या भाडे तत्वावरील विद्युत बसचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अन्य सहा जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे
दादर बेस्ट बस भीषण अपघात


मुंबई, 08 जून (हिं.स.) - दादर प्लाझाजवळ बेस्टच्या भाडे तत्वावरील विद्युत बसचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अन्य सहा जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. बेस्टची 463 क्रमांकाची बस प्लाझा सिनेमाजवळून जात असताना चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकींसह काही चारचाकी गाड्यांना बसची धडक बसली. यात एक दुचाकी बसखाली आल्याची माहिती आहे. या अपघातामुळे प्रवाशामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

1) नियाझ अहमद/पुरुष-वय २८ वर्षे (ईव्ही स्कूटर चालक) - रुग्णालयात आणले असता मृत घोषित2) अमित म्हात्रे-पुरुष/वय ४१ वर्षे (पादचारी) - रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

३) ऋषभ गुप्ता-पुरुष/वय २२ वर्षे (बाईक चालक) - रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर.

४) महेश डोईफोडे-पुरुष/वय ५० वर्षे (बेस्ट इन्स्पेक्टर) - रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

५) विकास पडारे-पुरुष/वय ४२ वर्षे (बस चालक) - रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

६) राजेंद्र पेलेकर (बस वाहक)-पुरुष/वय ५७ वर्षे - रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

७) सतीश वाघमारे-पुरुष/वय ४८ वर्षे (बेस्ट इन्स्पेक्टर) - रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

मागील तीन वर्षांत झालेले बेस्ट बसचे अपघात

जानेवारी 2023 ते डिसेंबर 2025 या तीन वर्षांच्या कालावधीत बेस्ट बसचे 958 अपघात झाले. त्यामध्ये 77 जणांचा मृत्यू आणि 217 जण जखमी झाले. यापैकी 85 टक्क्यांपेक्षा जास्त अपघात सुमारे 815 अपघात हे भाडेतत्त्वावरील बसशी संबंधित होते. 2025 मध्ये 606 मोठे आणि किरकोळ अपघात नोंदवले गेले असून त्यापैकी 582 अपघात भाडे तत्त्वावरील बसांचे होते. 2024-25 वर्षात झालेल्या 12 प्राणघातक अपघातांपैकी 10 अपघात भाडेतत्त्वावरील विद्युत बसचे होते. 2025-26 मध्ये बेस्ट बस अपघातांमधील 24 मृत्यूंपैकी 88 टक्के मृत्यू भाडेतत्वावरील बसशी संबंधित आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande