गर्भनिदान सेंटर प्रकरणी डॉक्टरांच्या प्रतिमेस भाजपाचे जोडेमार आंदोलन
मालेगाव, 08 जून (हिं.स.)। : येथील बेकायदेशीर अल्पवयीन प्रसूती करणाऱ्या डॉक्टर डांगे, गर्भ निदान करणार्या सेंटरच व बोगस डॉक्टर यांची साकोल चौकशी करणे बाबत भाजपा मालेगाव यांचे वतीने अपरजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच डॉ किशोर डांगे यां
BJP's shoe-waving protest


BJP's shoe-waving protest


मालेगाव, 08 जून (हिं.स.)। : येथील बेकायदेशीर अल्पवयीन प्रसूती करणाऱ्या डॉक्टर डांगे, गर्भ निदान करणार्या सेंटरच व बोगस डॉक्टर यांची साकोल चौकशी करणे बाबत भाजपा मालेगाव यांचे वतीने अपरजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच डॉ किशोर डांगे यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला.

माणुसकीला काळिमा फासेल असे कृत्य माजी आरोग्य अधिकाऱ्या कडून करण्यात आले. एका अल्पवयीन मुलीस शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले. सदर मुलीचे सिझेरिअन करत प्रसूती करण्यात आली. तिने एका बालिकेला जन्म दिला. सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही त्याबाबत रुग्णालय व तेथील डॉक्टरांनी पोलिस व आरोग्य प्रशासनास कुठलीही माहिती कळवली नाही. तसेच मुलीचे कोणतेही कायदेशीर कागदपत्र तयार न करता, वैद्यकीय अटीशर्तीचे उल्लंघन करून तिची प्रसूती केली. शिवाय तिची ओळख लपविण्यासाठी तिला अज्ञात ठिकाणी पळवून नेले. तिने जन्म दिलेल्या बाळाची विक्री करण्याच्या उद्देशाने ते रुग्णालयात ठेवून घेतल्याने खळबळ उडाली तसेच शहरात बोगस डॉक्टर सर्रास व्यवसाय थाटून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. अतिशय संताप जनक बाब म्हणजे एका बोगस डॉक्टरने एका महिलेची प्रसूती करतांना मृत नवजात बालकाला गोणीत घालून पाठवले आणि त्या महिलेचा देखील मृत्यू झाला. ह्या घटनेचा तीव्र निषेध करत सदर डॉक्टर व गर्भ निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेन्टर्सची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपा शहरध्यक्ष देवा पाटील यांच्या नेतृत्वात भाजपा मालेगाव यांनी केली.

मालेगाव शहरात सर्रास गर्भ निदान, गर्भपात सुरु असून बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. वैद्यकीय अटी-शर्तीचे उलंघन सर्रास मालेगाव शहरात होत असून, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देवा पाटील यांनी यावेळी केला. आज हे प्रकरण उघडकीस आले म्हणून याला वाचा फुटली अन्यथा किती प्रकरणे यापूर्वी झाली असावी. त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. तसेच बोगस डॉक्टर, दवाखान्यांची, बेकायदेशीर होणाऱ्या सोनोग्राफी सेंटरची कोंबिंग ऑपरेशन करून कारवाई करणे बाबत... हे होत असतांना यापूर्वी देखील शहरात काही नामांकित डॉक्टर्स कडून सोनोग्राफी सेंटर वर लिंग चाचणी करण्यात आल्याने त्यांचे सेंटर बंद झाले होते.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा अश्या प्रकारच्या कृत्याला चालना मिळते. शहरात एखादी मोठी घटना घडली किंवा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने माहिती दिल्यावरच अश्या घटना उघडकीस येतात. प्रशासन स्वताहून का कारवाई नियमित यावर करीत नाही असा सवाल देखील यावेळी करण्यात आला .यावेळी निलेश कचवे, देवा पाटील, दादा जाधव, डॉ तुषार शेवाळे, हरिप्रसाद गुप्ता, श्याम गांगुर्डे, संदीप भुसे, अजय वाघ, आप्पा कुलथे, एकनाथ शिंपी, हसन शेख मेहबूब, राजिया शेख, नलिनी पाटील, प्रदीप मोरे, उज्वला वाघमोडे, वैष्णवी पाटील, अब्दुल अजीज, उमर शेख, ध्रुवील पाटील, हर्षल पवार, योगेश निकम, आर डी निकम, साधना वाजपेयी, सुरेखा भुसे, संगीता आहेर, रत्ना वाघ, कल्पना पाटील,निंबा आहिरे, संजय पाटील, अकबर शाह,अनिल पाटील, रोशन गांगुर्डे, आदी उपस्थित होते. ---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande