बसवराज पाटील मुरुमकर विक्रमी मताधिक्याने विजयी होतील - डॉ. अर्चना पाटील चाकूरकर
लातूर, 08 जून (हिं.स.)। महायुतीच्या कार्यकर्त्यांची मजबूत संघटनात्मक ताकद, विकासाभिमुख विचारसरणी आणि मतदारांचा वाढता पाठिंबा यामुळे बसवराज पाटील मुरूमकर हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी व्यक्त के
बस्वराज पाटील


लातूर, 08 जून (हिं.स.)। महायुतीच्या कार्यकर्त्यांची मजबूत संघटनात्मक ताकद, विकासाभिमुख विचारसरणी आणि मतदारांचा वाढता पाठिंबा यामुळे बसवराज पाटील मुरूमकर हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केला.

धाराशिव बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार बसवराज पाटील मुरूमकर यांनी देवघर येथे भाजपा नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आगामी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.

लातूरधाराशिवबीड या महत्त्वाच्या विधान परिषद मतदारसंघातील निवडणूक राज्याच्या राजकारणात विशेष महत्त्वाची मानली जात आहे. महायुतीने या निवडणुकीसाठी बसवराज पाटील मुरूमकर यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या प्रचाराला वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी विविध राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक स्तरावरील मान्यवरांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. देवघर येथे झालेल्या या भेटीत निवडणुकीतील संभाव्य समीकरणे, मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचा प्रतिसाद तसेच महायुतीच्या विजयासाठी राबविण्यात येणाऱ्या रणनीतीवर चर्चा झाली.

डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की, महायुती सरकारने राज्यात विकासाची गती कायम ठेवत विविध लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. या विकासकामांचा आणि जनहिताच्या धोरणांचा सकारात्मक परिणाम मतदारांमध्ये दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधी देखील महायुतीच्या भूमिकेला पाठिंबा देत असून त्याचा फायदा या निवडणुकीत निश्चितपणे होणार आहे. कार्यकर्त्यांची मजबूत फळी, संघटनात्मक बळ आणि विकासाच्या मुद्यांवर आधारित प्रचारामुळे बसवराज पाटील मुरूमकर यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बसवराज पाटील मुरूमकर यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त

केला. मतदारसंघातील सर्व घटकांशी संवाद साधत विकासाचे प्रश्न प्राधान्याने मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी तसेच लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या सदिच्छा भेटीदरम्यान विविध सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही बसवराज पाटील मुरूमकर यांच्या उमेदवारीचे स्वागत करत महायुतीच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

निवडणुकीत विकास, सुशासन आणि जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर आधारित प्रचार होणे आवश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. देवघर येथे आहे. झालेली ही भेट केवळ औपचारिक न राहता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात महायुतीतील समन्वय, कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि नेतृत्वावरील विश्वास यामुळे बसवराज पाटील मुरूमकर यांच्या प्रचार मोहिमेला आणखी बळ मिळाल्याचे राजकीय निरीक्षकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या मतदारसंघातील राजकीय वातावरण अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून महायुतीने विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande