सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत डीसीसी बँक वाद केंद्रस्थानी
सोलापूर, 08 जून (हिं.स.)। विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार असून भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे वसंतराव देशमुख यांच्यात दुरंगी लढत रंगतदार बनली आहे. प्रचारा
सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत डीसीसी बँक वाद केंद्रस्थानी


सोलापूर, 08 जून (हिं.स.)। विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार असून भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे वसंतराव देशमुख यांच्यात दुरंगी लढत रंगतदार बनली आहे. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच डीसीसी बँकेतील कथित गैरव्यवहार आणि कर्ज थकबाकीचे मुद्दे केंद्रस्थानी आले असून दोन्ही बाजूंमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

महायुतीकडे संख्याबळाचे पारडे जड असल्याची चर्चा असून भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या मिळून सुमारे ४२८ मतांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचे पारडे सुरुवातीला मजबूत मानले जात आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदार हे प्रामुख्याने स्थानिक पदाधिकारी असल्याने वैयक्तिक संपर्क, गाठीभेटी आणि स्थानिक राजकीय समीकरणे निर्णायक ठरतात.

डीसीसी बँकेचा मुद्दा या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आहे. ही बँक एकेकाळी शेतकऱ्यांची आर्थिक जीवनवाहिनी मानली जात होती. मात्र शेती कर्ज, साखर कारखाने, सूत गिरण्या आणि शैक्षणिक संस्थांना दिलेल्या कर्जांमुळे मोठ्या प्रमाणावर थकबाकी निर्माण झाली आणि बँक आर्थिक अडचणीत सापडली. या बँकेचे अनेक संचालक राज्यातील दिग्गज नेते होते. त्यांच्यावर झालेले आरोप, चौकशा आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले.

काही नेत्यांनी चौकशीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर केले, तर काहींनी थकबाकी भरली असल्याचे सांगितले जाते.कथित गैरव्यवहार उघड करण्यामागे राजेंद्र राऊत यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा असून त्यांनी या प्रकरणात दीर्घकाळ न्यायालयीन लढाई लढली आहे. याच मुद्द्याचा उल्लेख सध्या प्रचारात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केला जात असून निवडणुकीतील वातावरण अधिक तापले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande