छ. संभाजीनगर-मोबाईल ॲपवरुन खत खरेदी; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनजागृती
छत्रपती संभाजीनगर, 08 जून (हिं.स.)राष्ट्रीय खत विक्री आराखड्यानुसार मोबाईल ॲपद्वारे खत नोंदणी व वितरण करण्यासाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीला यझर सेल, चा पथदर्शी प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविला जात आहे. आजपासून हा प्रकल्प कार्यान्वित झाला. फ
Q


छत्रपती संभाजीनगर, 08 जून (हिं.स.)राष्ट्रीय खत विक्री आराखड्यानुसार मोबाईल ॲपद्वारे खत नोंदणी व वितरण करण्यासाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीला यझर सेल, चा पथदर्शी प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविला जात आहे. आजपासून हा प्रकल्प कार्यान्वित झाला. फुलंब्री येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना या ॲप बद्दल माहिती देण्यात आली. जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंखे,उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, तहसीलदार योगिता खटावकर, कृषी अधिकारी पंकज वाकळे, कृषी अधिकारी गुणनियंत्रण शांतीलाल हिवराळे, राम बेंबरे आदी अधिकारी व कर्मचारी तसेच खत विक्रेते,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जनजागृतीपर पोस्टरचे विमोचनही जिल्हाधिकारी गौडा यांच्या हस्ते करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande