सोलापूर : मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांची माहिती पुन्हा मागविल्याने पोलिसांत चर्चा
सोलापूर, 08 जून (हिं.स.)। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने झाली होती. या आंदोलनांदरम्यान सोलापूर शहरात ७ तर ग्रामीण भागात ६० असे एकूण ६७ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ५६ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.दरम्यान, १ जून रोजी राज्याच्या गृह व
manoj


सोलापूर, 08 जून (हिं.स.)। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने झाली होती. या आंदोलनांदरम्यान सोलापूर शहरात ७ तर ग्रामीण भागात ६० असे एकूण ६७ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ५६ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.दरम्यान, १ जून रोजी राज्याच्या गृह विभागाने सर्व पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांकडून मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत अद्ययावत माहिती तातडीने मागविली. यापूर्वीही ही माहिती दोन-तीन वेळा सादर करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा त्याच स्वरूपाची माहिती मागविल्याने पोलिस विभागात चर्चेला उधाण आले आहे.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलक नेतेमनोज जरांगे पाटीलयांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर राज्याचे मंत्रीराधाकृष्ण विखे पाटीलआणि आमदारप्रसाद लाडयांच्या मध्यस्थीने आंदोलन एका दिवसात स्थगित करण्यात आले.या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने १ जून रोजी सर्व शहरांतील पोलिस आयुक्त आणि जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षकांना मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेबाबत अद्ययावत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. संबंधित माहिती त्याच दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत ऑनलाइन प्रणालीद्वारे पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते.मात्र, यापूर्वी सादर केलेल्या अहवालातील आकडेवारी आणि नव्याने मागविलेल्या माहितीत विशेष फरक नसतानाही पुन्हा माहिती संकलित करण्याची प्रक्रिया राबविण्यात आल्याने पोलिस यंत्रणेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही अधिकाऱ्यांच्या मते, राज्यस्तरावर गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेचा अद्ययावत आढावा घेण्यासाठी ही माहिती मागविण्यात आली असावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande