परभणी-हिंगोली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परमेश्वर कदम यांनी घेतली आ. विनय कोरेंची भेट
परभणी, 08 जून (हिं.स.)। परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीतील पक्षाची अधिकृत भूमिका आणि आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. विनय
नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांनी घेतली आ. विनय कोरे यांची भेट


परभणी, 08 जून (हिं.स.)। परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीतील पक्षाची अधिकृत भूमिका आणि आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. विनय कोरे यांची वारणानगर येथे नगराध्यक्ष परमेश्वर कदम, गटनेते हाजी सद्दाम हुसेन यांनी भेट घेऊन सखोल चर्चा केली.

परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाची ताकद, राजकीय समीकरणे यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पक्षाची आगामी काळातील वाटचाल मजबूत करण्यासाठी आणि निवडणुकीत भूमिका काय असावी, याबाबत आ. विनय कोरे यांनी स्थानिक नेत्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या भेटीचे राजकीय परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भेटी दरम्यान सोनपेठ शहराच्या विकासावरही चर्चा करण्यात आली. सोनपेठ नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवरही नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांनी आ. विनय कोरे यांचे लक्ष वेधले. पक्षाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर जनहिताची कामे अधिक गतीने कशी मार्गी लावता येतील, यावरही चर्चा झाली.

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरली असून, आ. कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात पक्षातर्फे ठोस पावले उचलली जातील असा विश्वास नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande