राष्ट्रवादीच्या उदगीर विधानसभा युवक अध्यक्षपदी बस्वराज शेरे यांची नियुक्ती
लातूर, 08 जून (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे आणि युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या मान्यतेने, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष निशांत वाघमारे (पूर्व) व प्रशांत घार
निवड


लातूर, 08 जून (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे आणि युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या मान्यतेने, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष निशांत वाघमारे (पूर्व) व प्रशांत घार (पश्चिम) यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या महत्त्वपूर्ण संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये बस्वराज शेरे यांची उदगीर विधानसभा युवक अध्यक्ष म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.

लातूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा औसा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष भरत प्रभाकर सूर्यवंशी यांनी बस्वराज शेरे यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान केले.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे आणि सर्व फ्रंटल व सेल प्रभारी आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट आणि गतिमान करण्यासाठी बस्वराज शेरे कार्य करतील, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.

युवकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करत नवतरुणांना पक्षाच्या विचारधारेशी जोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ते पार पाडतील, असे मत जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी यांनी यावेळी व्यक्त केले.

नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमाला नेमीचंद पाटील (तालुकाध्यक्ष, जळकोट), चंद्रकांत कत्ते (मराठवाडा पूर्व विभागीय अध्यक्ष, ओबीसी सेल), आनंद चाट पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), शंकर मोरे, परमेश्वर पोतने, तसेच वसीम बोपले (औसा तालुका युवक कार्याध्यक्ष) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande