मुलीच्या साखरपुड्याआधीच आईने तिच्या प्रियकराशी उरकलं लग्न, गावात खळबळ…!
जळगाव, 08 जून (हिं.स.) जामनेर तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका कुटुंबात घडलेल्या अनपेक्षित धक्कादायक घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले. पोटच्या मुलीचा साखरपुडा अवघ्या काही दिवसांवर आला असताना तिच्या आईने घर सोडून आपल्या परिचित प्र
मुलीच्या साखरपुड्याआधीच आईने तिच्या प्रियकराशी उरकलं लग्न, गावात खळबळ…!


जळगाव, 08 जून (हिं.स.) जामनेर तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका कुटुंबात घडलेल्या अनपेक्षित धक्कादायक घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले. पोटच्या मुलीचा साखरपुडा अवघ्या काही दिवसांवर आला असताना तिच्या आईने घर सोडून आपल्या परिचित प्रियकरासोबत विवाह केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एक गावातील संबंधित महिलेच्या मुलीचा साखरपुडा अवघ्या काही दिवसांत होणार होता. मात्र, महिला अचानक घरातून निघून गेल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही काळ तिचा संपर्क न झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती. सावत्र शोध घेतल्यानंतर हि महिला कुठे मिळून आली नाही. काही कालावधीनंतर सोशल मीडियावर संबंधित व्यक्तीच्या सोशल मीडिया खात्यावर विवाहासंदर्भातील फोटो आणि माहिती प्रसिद्ध झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. ही माहिती समोर आल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घटनेनंतर संबंधित महिलेच्या पतीने पोलिसांशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. कुटुंबाची सामाजिक अडचण आणि मुलीच्या आगामी साखरपुड्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मदतीची विनंती केल्याचे समजते. पोलिसांनी दोन्ही संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून आवश्यक समुपदेशन केले असून पुढील घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, या घटनेची परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande