छ. संभाजीनगर-माझं गाव आरोग्य संपन्न गाव अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मुर्शीदाबाद वाडी येथे भेट
छत्रपती संभाजीनगर, 08 जून (हिं.स.)मौजे मुर्शीदाबाद वाडी ता. फुलंब्री येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. माझं गाव – आरोग्य संपन्न गाव या अभियानाचा आढावा घेण्यात आला. तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष
Q


छत्रपती संभाजीनगर, 08 जून (हिं.स.)मौजे मुर्शीदाबाद वाडी ता. फुलंब्री येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. माझं गाव – आरोग्य संपन्न गाव या अभियानाचा आढावा घेण्यात आला. तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंखे, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार योगिता खटावकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निरोगी पर्यावरणासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. चला, हरित व आरोग्यसंपन्न गाव घडविण्यासाठी एकत्र येऊया, असा संदेश जिल्हाधिकारी गौडा यांनी ग्रामस्थांशी बोलतांना दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande