अमरावतीतील राजकमल उड्डाणपूल पाडकाम अंतिम टप्प्यात
नव्या पुलाच्या उभारणीची प्रतीक्षा अमरावती, 08 जून (हिं.स.) |अमरावती शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला राजकमल चौकाशी जोडणारा रेल्वे उड्डाणपूल पाडण्याचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पुलावरील बहुतांश भाग हटविण्यात आला असून
रेल्वे उड्डाणपूल पाडकाम अंतिम टप्प्यात; नव्या पुलाच्या उभारणीची प्रतीक्षा


नव्या पुलाच्या उभारणीची प्रतीक्षा

अमरावती, 08 जून (हिं.स.) |अमरावती शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला राजकमल चौकाशी जोडणारा रेल्वे उड्डाणपूल पाडण्याचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पुलावरील बहुतांश भाग हटविण्यात आला असून रेल्वे रुळांवरील गर्डर उघडे झाले आहेत. हे गर्डर रेल्वेच्या उच्चदाब वीजवाहिन्यांवर असल्याने त्यांचे सुरक्षितरीत्या विसर्जन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सध्या रात्री १२ ते पहाटे ५ वाजेदरम्यान ब्लॉक घेऊन पाडकामाची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित गर्डर हटविल्यानंतर पुलाचे संपूर्ण पाडकाम पूर्ण होणार असून त्याठिकाणी नवीन आणि अधिक सुरक्षित उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. सदर पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असल्याने ऑगस्ट २०२५ मध्ये तो बंद करण्यात आला होता. तेव्हापासून नागरिकांना राजकमल चौक गाठण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.पुलाचे पाडकाम अंतिम टप्प्यात पोहोचल्याने आता नव्या पुलाच्या बांधकामाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरवासीयांचे लक्ष आता नव्या उड्डाणपुलाच्या उभारणीकडे लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande