कर्जमाफीतील अटींविरोधात रोहित पवारांचे पंढरपुरातून अन्नत्याग आंदोलन जाहीर
सोलापूर, 08 जून (हिं.स.)। राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली तरी त्यासाठी घालण्यात आलेल्या नियम व अटींमुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रो
कर्जमाफीतील अटींविरोधात रोहित पवारांचे पंढरपुरातून अन्नत्याग आंदोलन जाहीर


सोलापूर, 08 जून (हिं.स.)।

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली तरी त्यासाठी घालण्यात आलेल्या नियम व अटींमुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, या मागणीसाठी आंदोलनाची घोषणा केली आहे.या मागणीसाठी आ. रोहित पवार दि. १२ जूनपासून पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत. पंढरपूर हे राज्यातील आंदोलनांचे पारंपरिक प्रारंभस्थळ मानले जाते. श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन अनेक आंदोलनांना येथे सुरुवात करण्यात आली असून त्यांना यश मिळाल्याचे उदाहरणेही यापूर्वी पाहायला मिळाली आहेत.याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही पूर्वी आपली आंदोलने पंढरपुरातून सुरू केली होती. विठ्ठल हा शेतकऱ्यांचा देव मानला जात असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधोरेखित करण्यासाठी पंढरपूर हे प्रतीकात्मक ठिकाण असल्याचे सांगितले जाते.आंदोलनाची सुरुवात १२ जून रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन होणार असून त्यानंतर प्रदक्षिणा करण्यात येणार आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शिवतीर्थावर अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ केला जाईल.या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकरी कर्जमाफीच्या अटी शिथिल करून सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळावा, ही प्रमुख मागणी या आंदोलनातून पुढे करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande