रत्नागिरीत बुधवार-गुरुवारी श्रीमद्भगवद्गीता भक्ती, कर्म, ज्ञानविषयक प्रवचने
रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) । येथील श्री राधाकृष्ण मंदिरात अधिक ज्येष्ठ मासाचे औचित्य साधून १० आणि ११ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्रीमद्भगवद्गीता भक्ती, कर्म, ज्ञानविषयक प्रवचने होणार आहेत. श्रीमद्भगवद्गीता भक्ती, कर्म आणि ज्ञान, जीवनातील प्र
रत्नागिरीत बुधवार-गुरुवारी श्रीमद्भगवद्गीता भक्ती, कर्म, ज्ञानविषयक प्रवचने


रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) । येथील श्री राधाकृष्ण मंदिरात अधिक ज्येष्ठ मासाचे औचित्य साधून १० आणि ११ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्रीमद्भगवद्गीता भक्ती, कर्म, ज्ञानविषयक प्रवचने होणार आहेत.

श्रीमद्भगवद्गीता भक्ती, कर्म आणि ज्ञान, जीवनातील प्रश्नांची उत्तरे गीतेच्या प्रकाशातून या विषयावरील ही प्रवचने रत्नागिरीतील प्रवचनकार सौ. सायली मुळ्ये- दामले देणार आहेत. या प्रवचनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेचे अध्यक्ष राजन शामकांत मलुष्टे व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande