गुरुभक्ती, नामस्मरण आणि सामूहिक साधनेचा जिंतूरमध्ये अद्भुत संगम
परभणी, 08 जून (हिं.स.)। श्रीमत् प.प.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराज समाधी शताब्दी सोहळा 2028 निमित्त आयोजित करण्यात आलेले श्रीमत् प.प.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराज (सप्ताध्यायी) चरित्राचे तिसरे सामूहिक पारायण रविवारी जिंतूर येथील श्री नगरेश्व
गुरुभक्ती, नामस्मरण आणि सामूहिक साधनेचा जिंतूरमध्ये अद्भुत संगम


परभणी, 08 जून (हिं.स.)।

श्रीमत् प.प.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराज समाधी शताब्दी सोहळा 2028 निमित्त आयोजित करण्यात आलेले श्रीमत् प.प.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराज (सप्ताध्यायी) चरित्राचे तिसरे सामूहिक पारायण रविवारी जिंतूर येथील श्री नगरेश्वर मंदिरात अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. या सोहळ्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी सामूहिक पारायणास प्रारंभ झाला. उपस्थित भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि एकाग्रतेने चरित्राचे वाचन केले. पारायणानंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नाममंत्राचे सामूहिक नामस्मरण करण्यात आले. नामगजराने मंदिर परिसर भक्तिरसाने भारावून गेला. पुढे पंचपदी, आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी पूज्य श्री भक्तेशभाई महाराज तसेच श्री गुंजेशभाई महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थितांना गुरुसेवा, नामस्मरण आणि सामूहिक साधनेचे महत्त्व पटवून देत आध्यात्मिक मार्गदर्शन केले. जिंतूर शहरासह परिसरातील विविध गावांमधून आलेल्या अबालवृद्ध भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदविला. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण सोहळा अधिक संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवक, सेवेकरी, देणगीदार आणि भाविक भक्तांनी विशेष परिश्रम घेतले. भविष्यातही अशा प्रकारचे आध्यात्मिक आणि संस्कारवर्धक उपक्रम नियमितपणे आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. गुरुभक्ती, नामस्मरण आणि सामूहिक साधनेचा अद्वितीय अनुभव या पारायण सोहळ्यामुळे लाभला, अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande