छ. संभाजीनगर-रेल्वेतील ८० लाखांच्या चोरीचा उलगडा,आरोपी जेरबंद
छत्रपती संभाजीनगर, 08 जून (हिं.स.)लोहमार्ग पोलिसांनी पंजाब मेलमधील प्रवाशाची बॅग चोरी प्रकरणाचा यशस्वी उलगडा करत एका आरोपीला अटक केली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाची सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व अन्य मौल्यवान वस्तू असलेली बॅग चोरीला गेल
छ. संभाजीनगर-रेल्वेतील ८० लाखांच्या चोरीचा उलगडा,आरोपी जेरबंद


छत्रपती संभाजीनगर, 08 जून (हिं.स.)लोहमार्ग पोलिसांनी पंजाब मेलमधील प्रवाशाची बॅग चोरी प्रकरणाचा यशस्वी उलगडा करत एका आरोपीला अटक केली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाची सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व अन्य मौल्यवान वस्तू असलेली बॅग चोरीला गेली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. मनमाड येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे ८० लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास लोहमार्ग पोलिसांकडून सुरू असून आरोपीच्या इतर साथीदारांचाही शोध घेतला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande