जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाथरी न्यायालय परिसरात वृक्षारोपण
परभणी, 08 जून (हिं.स.)। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तालुका विधी सेवा समिती पाथरी, दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर पाथरी व वकील संघ पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दिवाणी न्यायालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रमुख
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाथरी न्यायालय परिसरात वृक्षारोपण


परभणी, 08 जून (हिं.स.)। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तालुका विधी सेवा समिती पाथरी, दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर पाथरी व वकील संघ पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दिवाणी न्यायालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पाथरी एम. एस. काझी हे होते. यावेळी पाथरी वकील संघाचे अध्यक्ष अँड. टी. बी. कुलकर्णी यांच्यासह अँड. मगर, अँड. चव्हाण तसेच वकील संघाचे सदस्य उपस्थित होते. तसेच सरकारी अभियोक्ता अँड. सुतार, पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थितांच्या सक्रिय सहभागामुळे वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande