
परभणी, 08 जून (हिं.स.)। चारठाणा येथील ग्रामपंचायत कार्यालयाची वार्डनिहाय आरक्षण सोडतीची बैठक बोलविण्यात आली. या बैठकीला कृषी विस्तार अधिकारी एम. डी. डुकरे, प्रशासक म्हणून अनिरुद्ध चव्हाण, ग्रामविकास अधिकारी डी. आर. कांगणे यांची उपस्थिती होती.
यावेळी कृषी विस्तार अधिकारी एम. डी. डुकरे यांनी वार्डनिहाय यादी वाचून दाखविली त्यानंतर चिठ्ठी काढून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. मारिया माजिद सय्यद व सय्यद शोहेब सय्यद फिरोज या दोन्ही बालकांच्या हाताने चिठ्ठी काढण्यात आली.
वार्डनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
-वार्ड क्रमांक एक - सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण व ओबीसी महिला
-वार्ड क्रमांक दोन - सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, ओबीसी महिला
-वार्ड क्रमांक तीन - सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, ओबीसी पुरुष
-वार्ड क्रमांक चार - अनु. जाती महिला, ओबीसी पुरुष
-वार्ड क्रमांक पाच - सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, ओबीसी महिला
-वार्ड क्रमांक सहा - सर्वसाधारण दोन, सर्वसाधारण महिला
याप्रमाणे १७ सदस्याची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
या बैठकीस माजी सरपंच असगर देशमुख, पंचायत समिती सदस्य तहेसीन देशमुख, गणेश पारवे, जलील इनामदार यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis